स्मार्ट download

5 comments
         आजच्या जगात प्रत्येक काम करताना आपल्या सर्वांना इंटरनेट आणि कॉम्प्युटर गरज पडते, किेंबहुना इंटरनेट आणि कॉम्प्युटर शिवाय आपण कोणतेही काम प्रभावीपणे , अचूक व गतीने करू शकणार नाही. कोणताही संदर्भ, माहिती अथवा अभ्यास असो किंवा मनोरंजन असो पदोपदी  अनेक फाइल आपण डाउनलोड करत असतो(गरजेच्या आणि गरज नसलेल्याही).. पण जर इंटरनेट कनेक्शन  स्लो असेल तर डाउनलोड करणे ही एक डोकेदुखी ठरते. अनेक वेळा अर्धेअधिक झालेले डाउनलाेड  बंद होते व परत सुरूवातीपासून डाउनलोड करावे लागते. ही डाउनलोडची प्रक्रिया सोपी करून देणारी अनेक ॲप आज उपलब्ध आहेत, पण ही सर्वच कुठेना कुठे आपला भ्रमनिरास करतात.पॉज केलेले डाउनलोड सुरूच होत नाही, पहिल्यापासून सुरू होते, हवी ती फाइल मिळत नाही,एक ना अनेक अडचणी येतात. आणि याच अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
     
इतर कोणत्याही ब्राउजर किंवा ॲप पेक्षा कितीतरी चांगला डाउनलोड चा अनुभव देणारे तंत्रज्ञान व ॲप्स आज इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहेत. त्यातीलच काही उपयुक्त माहिती येथे देत आहोत......





      २. डाउनलोड मॅनेजर :  इतर कोणत्याही साइटवरून (टोरेंट शिवाय) डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाइल किंवा PC वर असे सॉफ्टवेअर खूप उपयोगी ठरते.
       ॲन्ड्रॉइड साठी Advanced Download Manager (ADM)हे ॲप सर्वोत्तम आहे. हे ॲप प्ले स्टोअर वर मोफत मिळते.
        ॲप कसे वापरावे ?
     १.  सामान्य साइटवरून डाउनलोड वर क्लिक केल्यानंतर एक पाॅप अप विंडो,  Android downloader अथवा Advanced Download Manager यापैकी एका पर्यायाची फाइल डाउनलोडसाठी विचारणा करेल. यातून तुम्ही Advanced Download Manager निवडा व Use always वर क्लिक करा.
     २.   तसे न झाल्यास ब्राउजरच्या ॲड्रेस बार मधून डाउनलोड ॲड्रेस कॉापी करा व Advanced download Manager ओपन करून + वर क्लिक करा. व त्यात ॲड्रेस पेस्ट करा
     डाउनलोड सूरू होइल. 

5 comments:

  1. PAYABHOOT CHACHNI GUN NODE TAKTA UPLABDHA KARUN DENE. 2016 SATHI

    ReplyDelete
  2. PAYABHOOT CHACHNI GUN NODE TAKTA UPLABDHA KARUN DENE. 2016 SATHI

    ReplyDelete
  3. blog khup chhan aahe .sarv prakarche manual sudha blog var theva .jyamule sarvana school,student,staff var kam karne sope hoil .

    ReplyDelete
  4. छान माहिती आहे.सर्वांना उपुक्त अशी .आपणास पुढील शैषणिक कार्यास शुभेच्छा.

    ReplyDelete